माझी लाडकी बहीण चे अर्ज आत्ता फक्त अंगणवाडी तर्फे भरले जाणार ! शासन निर्णय आला

Ladki Bahin Yojana Application New Rule:मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करणेबाबत

राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

Jio ने 90 दिवसांच्या वैधतेसह रिचार्ज लॉन्च केला, किंमत फक्त 199 रुपये

शासन निर्णय दि.०२.०९.२०२४ अन्वये “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर, २०२४ मध्ये या योजनेंतर्गत नोंदणी सुरु ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे.

या योजनेंतर्गत यापूर्वी ११ प्राधिकृत व्यक्तिना अर्ज स्विकारण्यास परवानगी देण्यात आली होती.

आता, सदर योजनेंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जाची संख्या मर्यादित होत असल्याने फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकेमार्फत अर्ज स्विकारण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

“मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर, २०२४ मध्ये या योजनेंतर्गत नोंदणी सुरु ठेवण्यास संदर्भाधीन दि.०२.०९.२०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आह.

या योजनेंतर्गत संदर्भाधीन शासन निर्णय दि.१२.०७.२०२४ व दि.२५.०७.२०२४ अन्वये नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका/अंगणवाडी सेविका, “समूह संघटक-CRP (NULM, MSRLM व MAVIM)”, मदत कक्ष प्रमुख, CMM (City Mission Manager), आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, आंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र या ११ प्राधिकृत व्यक्तिना अर्ज स्विकारण्यास प्राधिकृत करण्यात आले होते.

आता या शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत व्यक्तिना अर्ज स्विकृतीचे देण्यात आलेले अधिकार रद्द करण्यात येत आहे.

ST बसचे नवीन तिकीट दर जाहीर ! या नागरिकांना मोफत प्रवास मिळणार

सबब, या शासन निर्णयाच्या दिनांकापासून फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकामार्फत अर्ज स्विकारण्यास मान्यता देण्यात येत आहे.

Leave a Comment